बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातहून सिंहाची जोडी येऊन आठवडा पूर्ण होण्याअगोदरच वाघाटी ही जंगली मांजर उद्यानात दाखल झाली आहे. सांगलीहून अंदाजे दोन आठवड्यांची वाघाटी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आली आहे. वाघाटीच्या आगमनाबाबत उद्यान प्रशासनाने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.
वाघाटी मांजर सापडले
आईपासून विलग झालेल्या केवळ पंधरा दिवसांच्या वाघाटीला सांगलीहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले आहे. या वाघाटीला अजूनही पूर्णपणे दोन्ही डोळे उघडता येत नाही. वाघाटी ही जंगलात राहणा-या मांजरांपैकी जगातील सर्वात लहान मांजर आहे. वाघाटी ही अत्यंत दुर्मिळ मांजर समजली जाते. पूर्ण वाढ झालेल्या वाघाटीचे वजन जेमतेम दीड किलोचे असते. मात्र आईपासून विलप्त झालेल्या वाघाटीचे आईसोबत मिलन न झाल्यास त्याला पिंज-यात पाळणे अत्यंत आव्हानात्मक समजले जाते. अशातच केवळ दोन आठवड्यांच्या वाघाटीला वाचवण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय अधिका-यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या वाघाटीच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांनी प्रतिसाद दिला नाही.
(हेही वाचा मुंबई विमानतळ ठप्प, कारण…)
Join Our WhatsApp Community