मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विकेंड आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या गर्दीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Mumbai-Goa Highway)
विकेंड आणि उन्हाळी सुट्टीमुळे पर्यटनासाठी पर्यटक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रायगडमधील माणगावजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून उन्हाच्या कडाक्यात लागलेल्या या ट्रॅफिकमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Mumbai-Goa Highway)
(हेही वाचा – Maharashtra Board Result 2024: सोशल मीडियावरील ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नका, शिक्षण मंडळाचे आवाहन)
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न
महाराष्ट्र शासनाच्या अनेक एसटी बसेसमधील प्रवासी तसेच सुट्टीसाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. वाहतूक पोलीस प्रशासनाकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community