Mumbai-Goa Highway: परशुराम घाटातील घरांना दरडींचा धोका; नेमकी परिस्थिती काय? 

राष्ट्रीय महामार्गावरील रुंदीकरणामुळे परशुराम घाटा जवळील अनेक घरांना दरडींचा धोका कायम, ग्रामस्थांच्या समस्यांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही आश्वासनपूर्ती केली जात नाही.

146
Mumbai-Goa Highway: परशुराम घाटातील घरांना दरडींचा धोका; नेमकी परिस्थिती काय? 
Mumbai-Goa Highway: परशुराम घाटातील घरांना दरडींचा धोका; नेमकी परिस्थिती काय? 

राष्ट्रीय महामार्ग ६६ (National Highway 66) म्हणजेच, मुंबई-गोवा महामार्गा (Mumbai-Goa Highway) वरील परशुराम (Parshuram Ghat) घाटाची यंदाही पावसामुळे स्थिती धोकादायक झाली आहे. परिणामी पावसामुळे धोकादायक दरडी (dangerous cliff)  परशुराम घाटाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पेढे (Pedhe) आणि परशुराम येथील ६१ घरांवर कोसळण्याचा धोका कायम आहे. प्रशासनाकडून संबंधित नागरिकांना स्थलांतर करावे, यासाठी दरवर्षी नोटीस बजावली जाते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप यासाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घरांवर दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. (Mumbai-Goa Highway)

(हेही वाचा – UP Police: पोलीस उपअधीक्षकाचा झाला कॉन्स्टेबल; नेमकं कारण काय?)

पहिल्याच पावसात पेढे येतील एका घराच्या खिडकीपर्यंत मातीचा भराव आल्याने घरात पाणी शिरण्याचा प्रकार घडला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दोन्ही गावांमध्ये पुन्हा इर्शाळवाडी (Irshalwadi) होण्याची सरकार वाट पाहत आहे का, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पेढे व परशुराम येथील अनेक घरांनाही दरडींचा धोका कायम आहे. या घरांभोवती कोणतीही संरक्षक भिंत बांधण्यात आलेले नाही. (Mumbai-Goa Highway)

(हेही वाचा – Himanta Biswa Sarma: घर, शौचालय, रस्ते, सरकारी नोकऱ्या, रेशन मोदींकडून मिळवलं, पण मतदान…; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल)

यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. पेढे व परशुराम या दोन्ही गावांना जोडणारी पारंपरिक पायवाटही या महामार्गाच्या रुंदीकरणात उद्ध्वस्त करण्यात आली. परंतु येथे पूल अथवा पाखाडी बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेतील मुले, शेतकरी यांना येण्या-जाण्याचा जवळचा मार्ग बंद झाला आहे. पैसे खर्च करून गाडीने प्रवास करावा लागत आहे. केवळ आश्वासनापलीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही आश्वासनपूर्ती केली जात नाही. अशी समस्या परशुराम ग्रामपंचयातीच्या नागरिकांनी बोलून दाखवली.   (Mumbai-Goa Highway)

हेही पाहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.