Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना

158
Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना
Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना

कोकणात जाण्यासाठी मुंबई व कोकणातील कोकणवासियांसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) 66 च्या दुरावस्थेबाबत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना निवेदन देताच याची गंभीर दखल घेत गणेशोत्सवापूर्वी (Ganesh Chaturthi 2024) हा महामार्ग तात्काळ रस्ते वाहतूकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना केंद्रातील रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे तांत्रिक सल्लागार बालासाहेब ठेंग यांनी संबंधित विभागांना पत्र पाठवून दिल्या आहेत.

(हेही वाचा – Russia Ukraine War : रशियात ‘9/11’, युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर)

मुंबई गोवा राज्य मार्गाच्या (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. ४७१ कि.मी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या राज्य मार्गाचे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहे. अद्याप या महामार्गचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यातील अनेक ठीकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या मार्गावरून गणेशउत्सव, होळी, मे माहीन्याच्या सुट्टी मध्ये रस्ते मार्गे कोकणात जाताना प्रवाश्यांना या मार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे यांचा सामना करावा लागतो. यामुळे या मार्गावरून प्रवास करताना चाकरमान्यांना आपले कोकणातील घर गाठण्यासाठी 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयाचा मुंबई गोवा महामार्गावरील रस्ते प्रवास खड्डे मुक्त करावा, असे निवेदन खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेट घेऊन दिले होते. त्यावेळी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य मार्गावरली खड्डे बुजवून रस्ते वाहतूकीसाठी सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी दिले होते. तशा सूचना त्यांनी संबंधीत विभागाला दिल्या होत्या. याची गंभीर दखल घेत गणेशोत्सवापूर्वी हा महामार्गे (Mumbai-Goa Highway) तात्काळ रस्ते वाहतूकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना केंद्रातील रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे तांत्रीक सल्लागार बालासाहेब ठेंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी मुंबई तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग, नवी मुंबई या संबंधीत विभागांना पत्र पाठवून दिल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.