बहुचर्चित असलेला मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) बांधकाम अद्याप ही अपूर्णच आहे. या महामार्गाचे काम रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासीय नाराज आहेत. गेली अठरा वर्षे झाली या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे गोवा अन् कोकणला जाणारे वाहनधारक संतप्त आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या महामार्गासाठी डिसेंबर 2024 ची दिलेली डेडलाईन आता हुकली आहे. परंतु त्यातील एक चांगली बातमी आली आहे. या महामार्गावरील कशेडीतील (Kashedi tunnel) दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. (Mumbai Goa Highway)
कशेडी येथील पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतीकरणाची कामे जवळपास पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील.
(हेही वाचा – Union Carbide चा विषारी कचरा तब्बल 40 वर्षांनंतर उचलला)
45 मिनिटांचा प्रवास 8 मिनिटांत
मुंबई-गोवा महामार्गावर सर्वांत अवघड आणि धोकेदायक कशेडी घाट (Kashedi Ghat) आहे. या घाटात सुमारे दोन किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे केले आहे. कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वाहनधारकांना चांगला दिलासा मिळणार आहे. या महामार्गावर बोगद्याच्या परिसरात 45 मिनिटांचा असणारा प्रवास 8 मिनिटांत होणार आहे. यामुळे कोकणवासियांचा रस्ते प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community