मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ३ तासांपासून ठप्प; कंटेनर उलटल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

145

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झालेली आहे. रत्नागिरीतील लांजाजवळ वेरळ घाटामध्ये कंटेनर उलटल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नसल्यामुळे आधीच वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातच वेरळ घाटात कंटेनर उलटल्यामुळे आता दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झालेली आहे.

( हेही वाचा : १ नोव्हेंबरपासून कारमध्ये सहप्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक; नवा नियम टॅक्सी संघटनांना अमान्य)

कंटेनर उलटल्यामुळे ३ तासांपासून वाहतूक ठप्प

मुंबईच्या दिशेने येणारा कंटेनर रत्नागिरीतील वेरळ घाटात उलटला आहे. या जागेवर वारंवार अपघात होत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होतो. यामुळे या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर वेरळमधील या अपघाती वळणावर लक्ष प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कंटेनर उलटल्यामुळे आता सद्यस्थितीला तीन तासांपासून केवळ लहान गाड्यांची एकेरी वाहतूक सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अवजड वाहतूक बंद 

रस्त्यावर लहान जागा असल्याने येथून अवजड वाहने जाऊ शकत नाहीत, क्रेन मागवण्यात आलेली आहे त्यानंतर ही वाहतूक पूर्वपदावर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.