Mumbai-Goa Highway वर तीन दिवसांचा ब्लॉक

105
Mumbai-Goa Highway वर तीन दिवसांचा ब्लॉक

कोलाड जवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे. सर्व प्रवाशांनी या कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग प्रशासनाला करण्यात आले आहे. (Mumbai-Goa Highway)

या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग –

१) वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा-कालाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
२) वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपुर-माणगांव वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. (Mumbai-Goa Highway)

(हेही वाचा – James Anderson : ४१ वर्षीय जेम्स अँडरसनला इंग्लंडने संघातून वगळलं)

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग –

१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणे वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
२) कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ करता येईल.
३) कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गावरून मार्गस्थ करता येईल. (Mumbai-Goa Highway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.