मुंबई-गोवा महामार्ग राहणार रात्रभर बंद, एलपीजी गॅसने भरलेला टँकर कोसळला

232

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावरील लांजा तालुक्यात असणा-या आंजणारी पुलावरुन एलपीजी गॅसची वाहतूक करणारा टँकर नदीत कोसळला आहे. या टँकरमधून गॅसची गळती वेगाने होत असून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी सावधानता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या महामार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

28 हजार किलो गॅस भरलेला एलपीजी टँकर

गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. पुलाचा कठडा तोडून एलपीजी टँकर पाण्यात कोसळला. या टँकरमध्ये तब्बल 28 हजार किलो एलपीजी गॅस भरलेला होता. या टॅंकरमधून होणारी गॅस गळती ही तत्काळ रोखण्यात आली आहे.

(हेही वाचाः खाल्ला गुटखा लागला ठसका… बातमी वाचून बसेल धक्का! काय घडलं नेमकं?)

पर्यायी मार्गाची व्यवस्था

हा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने एलपीजी गॅस वाहून नेत होता. त्यानंतर आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता कंटेनरला मोठा अपघात झाला. त्यामुळेच मुंबई-गोवा महामार्गावरील या भागातून होणारी वाहतूक ही गुरुवारी रात्रभर बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग आंजणारी पुलाच्या अलीकडून पालीमध्ये बाहेर पडणारा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.