कोकण मार्गावरून वंदे भारत कधी धावणार, याकडे चातकाप्रमाणे टक लावून पाहणाऱ्या कोकणवासीयांची प्रतीक्षा आता संपणार आहे. बालासोर रेल्वे अपघातामुळे वंदे भारतला हिरवा कंदील दाखवण्याचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर आता पुन्हा नव्याने मुहूर्त सापडला आहे. मंगळवार, 27 जून 2023 रोजी मडगाव इथे कोकण रेल्वेमार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोकणात होणारा पाऊस पाहता सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून केवळ तीन वेळा धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाळा संपला की वंदे भारतचं वेळापत्रकात बदल होऊन ट्रेन आठवड्यातून सहा वेळा धावेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे रविवारी ही ट्रेन बंद असणार आहे.
असे आहे वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
- सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईहून धावेल. तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही ट्रेन गोव्यावरुन धावेल.
- ही ट्रेन सीएसएमटी स्टेशन, मुंबईवरुन सकाळी 5.32 वाजता सुटेल आणि मडगाव स्टेशन, गोव्याला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. हा प्रवास दहा तासांचा असेल.
- तर परत येताना ही ट्रेन मडगावहून दुपारी 12.20 वाजता निघेल आणि मुंबईला रात्री 10.25 वाजता पोहोचेल. हा प्रवास देखील दहा तासांचा असेल.
(हेही वाचा मणिपूर हिंसाचार : पोलिसांनी २४ तासांत १२ बंकर पाडले; शहा – मोदींमध्ये बैठक होण्याची शक्यता)
- तर मान्सून गेल्यानंतर या ट्रेनचा वेग वाढवला जाईल आणि 586 किमी अंतर केवळ 7 तास 50 मिनिटांत कापेल. यादरम्यान ट्रेनला अकरा थांबे असतील.
- सध्या कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस ही वेगवान ट्रेन धावत आहे. ही ट्रेन 586 किमी अंतर 8 तास 50 मिनिटात पार करते. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांनाचा एक तास वाचणार आहे.
महाराष्ट्रातून धावणारी चौथी वंदे भारत एक्स्प्रेस
महाराष्ट्रातून सध्या तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. मुंबईहून शिर्डी, मुंबईहून सोलापूर आणि मुंबईहून गांधीनगर या तीन एक्स्प्रेस आहेत. या तिन्ही ट्रेनमध्ये 70 टक्के लोक प्रवास करतात. उद्या लोकार्पण होणारी मुंबई-गोवा ट्रेन ही या महाराष्ट्रातून धावणारी चौथी वंदे भारत एक्स्प्रेस असेल.
Join Our WhatsApp Community