मुंबईत थंडी वाढली; सोमवारचे कमाल आणि किमान तापमान वाचा…

105

वीकेण्डपासून किनारपट्टी भागांत थंडीचा प्रभाव वाढत असतानाच सोमवारी, २३ जानेवारी रोजी मुंबईत किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअसवर घसरले. येत्या दोन दिवसांत किमान तापमान १५-१६ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असल्याने हवेचा दर्जा येत्या दिवसांत अजूनच ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारी कमाल तापमानही २६.५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.  थंडीच्या दिवसांत मुंबईत धूलिकण हवेच साचून राहत असल्याने आता दृष्यमानताही खराब होऊ लागली आहे.

तोंडावर मास्क लावूनच बाहेर पडण्याचे आवाहन

सध्या किनारपट्टीवर किमान तापमानात थोडी घट दिसून येईल. कोकणात ३-४ दिवस तापमान काही अंशाने कमी नोंदवले जाईल. मात्र उत्तरेकडील थंडीच्या कडाक्याचा प्रभाव कोकण भागांत दिसून येणार नाही, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. या दिवसांत मुंबईतील विविध ठिकाणी वायू प्रदूषणात वाढ होईल. सोमवारी चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी तसेच नवी मुंबईत हवेचा दर्जा अतिखराब होता. तर माझगाव, बोरिवली, मालाड, भांडूप येथील हवेचा दर्जा ठीक होता. मुंबईत हवेचा दर्जा अतिखराब आणि ठीक असलेल्या भागांत तोंडावर मास्क लावूनच बाहेर पडा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

(हेही वाचा लव्ह जिहाद, गोहत्या विरोधात कराडमध्ये हिंदूंचा एल्गार)

हवेतीत अतिसूक्ष्म धूलिकणांचा दर्जा

अतिखराब स्थानके – प्रति क्यूबिक मीटरमध्ये

  • वांद्रे-कुर्ला संकुल – ३२९
  • चेंबूर – ३१२
  • नवी मुंबई – ३०७
  • अंधेरी – २३९

स्थानके – प्रति क्युबिक मीटरमध्ये 

  • माझगाव – १९७
  • भांडुप – १९५
  • बोरिवली – १२८
  • मालाड – १३५
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.