Mumbai Grant Road Fire : चोर बाजारातील ‘ती’ आग गुरुवारी रात्री पर्यंत धुमसतच होती

लाकडांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह अधिकाऱ्यांना तब्बल आठ ते नऊ तास लागले. दुपारी अकरा ते साडेअकरा पर्यंत ही आग आटोक्यात आली असली तरी संध्याकाळपर्यंत धुमसत होती. दरम्यान या आगीमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला असून या आगीमध्ये सुमारे ४० ते ५० लाकडांची गोदामे जळून खाक झाली आहेत.

345
Mumbai Grant Road Fire : चोर बाजारातील 'ती' आग गुरुवारी रात्री पर्यंत धुमसतच होती
Mumbai Grant Road Fire : चोर बाजारातील 'ती' आग गुरुवारी रात्री पर्यंत धुमसतच होती

ग्रँटरोड कामाठीपुरा येथील चोर बाजार परिसरातील जुन्या लाकडांच्या गोदामाला मध्य रात्री दोन वाजता लागलेली आग शुक्रवारी संध्याकाळपर्यंत धुमसतच होती. लाकडांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह अधिकाऱ्यांना तब्बल आठ ते नऊ तास लागले. दुपारी अकरा ते साडेअकरा पर्यंत ही आग आटोक्यात आली असली तरी संध्याकाळपर्यंत धुमसत होती. दरम्यान या आगीमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला असून या आगीमध्ये सुमारे ४० ते ५० लाकडांची गोदामे जळून खाक झाली आहेत. (Mumbai Grant Road Fire)

ग्रँटरोड येथील पट्टे बापुराव मार्गावरील जाफर भाई दिल्ली दरबाराजवळील परिसर मोठ्याप्रमाणात जुन्या लाकडांची गोदामे आहेत. या मार्गावर ४० ते ५० लाकडांची गोदामे असून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात जुन्या इमारतींमधील दरवाजे, खिडक्यांसह इतर लाकडी सामान खरेदी करून याठिकाणी गोदामात ठेवून त्यांची पुन्हा विक्री केली जाते. त्यामुळे हा मार्ग जुन्या लाकडांसाठी प्रसिध्द आहे. मात्र या लाकडांच्या गोदामांना गुरुवारी मध्य रात्री दोनच्या सुमारास आग लागण्याचा प्रकार घडला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ७ ते ८ हजार चौरस फुटाच्या जागेवर ही आग लागली होती. याठिकाणच्या गोदामात मोठ्याप्रमाणात जुन्या लाकडांचा साठा होता. (Mumbai Grant Road Fire)

(हेही वाचा – Muslim वस्त्यांमध्ये अफवांचे मेसेज व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न)

याठिकाणी गाळयाचे बांधकाम हे दोन मजल्यांपर्यंत होती. मध्य रात्री दोन वाजता लागलेली आग शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आटोक्यात आली. परंतु रात्रीपर्यंत ही आग धुमसतच होती. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान करत होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यामध्ये मोठ्याप्रमाणात लाकडे असल्याने त्यावर नियंत्रण मिळवले तरी ती आग धुमसत राहणार असल्याने त्यावर अधिक लक्ष ठेवून आहेत. (Mumbai Grant Road Fire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.