मुंबईच्या (Mumbai Fire) ग्रँट रोड (Grant Road) परिसरातील लाकडाच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर लाकडाचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. (Mumbai Grant Road Fire)
(हेही वाचा – 75th Republic Day : हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाची पंचाहत्तरी)
आगीचे कारण अस्पष्ट
खबरदारी म्हणून प्लॅटिनम मॉल (Platinum Mall) आणि रहिवासी इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे.
परिसरात खळबळ
मध्यरात्री तीनच्या सुमारास लाकडाच्या गोदामाला आग लागली. लाकडाचे गोदाम असल्याने आग वेगाने पसरत गेली. तसेच या आगीच्या परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान ही आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले.
(हेही वाचा – 75th Republic Day : संविधानातील ‘धर्म’ संकल्पना)
सांताक्रुझ घटना ताजी
२५ जानेवारी रोजी मुंबईतील (Mumbai) सांताक्रुझ परिसरात धीरज हेरिटेज (Dheeraj Heritage) या इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठी आग लागली होती. दरम्यान संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास इमारतीच्या बेसमेंटमध्ये पार्क केलेल्या गाड्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आली. या आगीमध्ये एका 45 वर्षीय महिलेचा मृ्त्यू झाला. या घटनेनंतर काही तासांतच ग्रॅंट रोड परिसरात आग लागली आहे. (Mumbai Grant Road Fire)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community