आरे शहराच्या मध्यभागी असणारं हे जगातील पहिलंच जंगल ठरणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (Sanjay Gandhi National Park) लागून आरे आहे.हे जंगल म्हणजे मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे जंगल आहे.याच जंगलामुळे मुंबईतील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत मिळाली आहे. मात्र या जंगलातून अलीकडे वाहनांची संख्या अधिक वाढली असून वायू प्रदूषणात मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आरेतून जाणाऱ्या वाहनांवर लवकरच आता ‘ग्रीन’ टोल आकारण्यात येणार आहे. (Aarey Forest)
आरे हे जंगल घोषित केल्यानंतर आता वनविभाग या भागातून जाणार्या वाहनांना प्रवासासाठी ‘ग्रीन टोल'(Green Toll) आकारण्याच्या विचारात आहेत. आरे शहराच्या मध्यभागी असणारं हे जगातील पहिलंच जंगल ठरणार आहे. राष्ट्रीय उद्यानाला लागून आरे आहे. आरेमध्ये न राहणारे जे नागरिक इको सेंसिटिव्ह झोन मधून जाणार आहेत त्यांच्यासाठी आता ग्रीन टोल आकारला जाणार आहे. रोजच्या रोज सुमारे 25,000 गाड्या आरे मिल्क कॉलनी रूटचा वापर करतात. या मार्गावरून त्यांना गोरेगावला जोडलं जातं तसेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून पवई आणि मरोळला देखील जाता येतं. (Aarey Forest)
(हेही वाचा : Water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा!)
इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या आरे परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल. पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुळे मुंबईतील पर्यावरणाचं संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे. २०१४ आधी देखील अशाप्रकारचा टोल होता, मात्र आरे कॉलनीतील मुख्य रस्ता पालिकेच्या अखत्यारीत आल्यानंतर टोल बंद करण्यात आला होता. जंगलातून रस्ता जात असल्यास वनविभागाला कर लावण्यासंदर्भात अधिकार असतो, त्यामुळे वनविभागाकडून हा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे . (Aarey Forest)
हेही पहा –