मुंबईतील फेरीवाल्यांविरोधातील (Mumbai Hawkers) मोहिम आता तीव्र झाल्याने आता फेरीवाल्यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे धाव घेऊन महापालिकेला ही कारवाई थांबवण्याची विनवणी केली आहे. मात्र, ही फेरीवाल्यांवर रस्ते, पदपथ आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारे सर्वच मार्ग अडवून ठेवल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष पसरल्याने राजकीय पक्षही जनतेच्या मागणीशी प्रामाणिक राहून त्यांनी महापालिकेच्या कारवाईचे समर्थन केले. परंतु राजकीय पक्ष हे मुळात व्यावसायिक फेरीवाल्यांच्या विरोधात नसून फेरीवाल्यांच्या नावाखाली जे भू माफिया तयार होत आहे, त्याला राजकीय पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे रस्ते आणि पदपथांच्या जागा अडवून भिवंडी, कळवा आणि मुंब्रा आदी ठिकाणांहून आलेल्या विशिष्ट समाजाच्या मुलांना भाड्याने जागा द्यायच्या आणि व्यावसाय करायचा या वाढत्या प्रस्थामुळे राजकीय पक्षानेही महापालिकेच्या या कारवाईचे समर्थन केल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबईत सध्या सुरु असलेल्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाईचे समर्थन आता राजकीय पक्षांकडून केले जात असून काही राजकीय पक्षांनी या कारवाईचे श्रेय घेत आपल्या प्रयत्नाने हा परिसर फेरीवाला मुक्त होत असल्याची फलकबाजी केली आहे. तर काहींनी या कारवाईत विशेष लक्षही दिले नाही. मात्र, एरव्ही महापालिकेच्यावतीने कारवाई हाती घेतल्याने राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी फेरीवाल्यांची (Mumbai Hawkers) बाजू घेण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच त्यांच्या पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न कला जात असल्याचा तसेच फेरीवाला धोरण लागू होईपर्यंत ही कारवाई केली जावू नये सांगत या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु प्रथमच महापालिकेच्या या दिर्घकाळ सुरु असलेल्या कारवाईत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत नसून उलट याचे समर्थन करताना ते दिसत आहेत.
(हेही वाचा – Hockey Olympic 2024: भारत देशाला चौथं पदक मिळालं; भारतीय हॉकी संघाची कांस्य पदकाला गवसणी)
भू माफिया, लँड जिहाद करणाऱ्या फेरीवाल्यांना विरोध
उत्तर मुंबईचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी बोरीवली येथील रेल्वे स्टेशन फेरीवालामुक्त झाल्याने समाधान व्यक्त करत स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नाने होत असलेल्या या महापालिकेच्या कारवाईबाबत प्रशासनाचे आभार मानले आहे. मुळात आम्ही व्यावसायिक फेरीवाल्याच्या (Mumbai Hawkers) विरोधात नाही. व्यावसायिक फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा नसून सध्या बोरीवलीमध्ये ज्याप्रकारे फेरीवाले वाढले होते आणि हे सर्व भू माफियांनी वाढवले होते. फेरीवाल्यांमध्ये जे भूमाफिया निर्माण झाले आहेत, त्यांच्या विरोधात आमचा पक्ष आहे. बोरीवली स्थानक परिसरात ज्याप्रकारे फेरीवाले बसत आहे, त्यातून लोकांना चालणे सोडा, गाड्या चालवणेही कठीण झाले होते होते. या भू माफियांनी येथील जागांवर हक्क सांगून त्या जागा भाड्याने दिल्या होत्या आणि या भाड्याच्या जागेवर कळवा, मुंब्रा, भिवंडी येथील विशिष्ट समाजाची लोक व्यवसाय करताना दिसत होते. त्यामुळे यामध्ये व्यावसायाचे गणित नाही, त्यामुळे रहिवाशांच्या मागणीनुसार ही कारवाई करण्याची मागणी आमच्या पक्षाच्यावतीने करण्यात आली होती, असे खणकर यांनी स्पष्ट केले.
तर दादरमध्ये सध्या महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांविरोधातील कारवाई जोरात सुरु आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात सुरु असलेल्या या कारवाईबाबत भाजपाच्या माहिम दादर विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी याबाबत बोलतांना, स्थानिक आणि मूळ फेरीवाल्यांविरोधात आमचा पक्ष नाही. जे मूळ फेरीवाले आहेत, त्यांनी व्यवसाय करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. परंतु दादरमधील जागांवर हक्क सांगून काही विशिष्ट समाजाची माणसे त्या जागा एका विशिष्ट समाजालाच भाड्याने देत एकप्रकारे आपल्या समाजाचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आमचा विरोध आहे. व्यावसायिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नसून भू माफिया, लँड जिहाद करणाऱ्या फेरीवाल्यांना आमचा विरोध आहे. उलट मी तर म्हणेन २०१४ च्या सर्वेमध्ये ज्या ९९ हजार फेरीवाल्यांनी आपले अर्ज भरून दिले होते, त्या सर्वांना व्यवसाय करण्यास दिले जावे, परंतु त्यांना भाड्याने या जागा देता येणार नाही. त्यांनी स्वत: फेरीचा व्यवसाय करावा, ही आमची भूमिका आहे, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community