- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेत महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांवर (Hawkers) करण्यात आलेली कारवाई मागील काही दिवसांपूर्वी थांबली. परंतु ही कारवाई थांबल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांनी विळखा घातला. हे सर्व फेरीवाले भाडोत्री असून या भाडोत्री फेरीवाल्यांकडून अशाप्रकारे जागा अडवली जात आहे, की पादचारी आणि रेल्वे प्रवाशांना चालताही येत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त हे शांत बसल्याने फेरीवाल्यांची संख्या फोफावली जात आहे. या फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासन किमान न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत तरी कारवाई करून रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करणार का असा सवाल स्थानिकांकडूनच केला जात आहे.
(हेही वाचा – Election Commission : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? कसे तपासाल?)
रिक्षावाल्यासोबत झालेल्या भांडणात फेरीवाल्यांना (Hawkers) रिक्षा चालकांच्या बाजूने उभे राहत प्रवाशाला बेदम मारहाण केली. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. फेरीवाल्यांनी हाती मिळेल त्या वस्तूने मुलाला मारहाण करतानाच त्याच्या आई-वडिलांनाही सोडले नाही. त्यामुळे हे सर्व फेरीवाले बाहेरुन आलेले असून हे सर्व फेरीवाले गुंडप्रवृत्तीचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे या मारहाणीनंतर फेरीवाल्यांवरील कारवाईचा मुद्दा ऐरणीवर आला असून मागील काही दिवसांपासून महापालिकेने हाती घेतलेली कारवाई थांबवल्यापासून भाडोत्री फेरीवाल्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढलेली पहायला मिळत आहे. दादर, अंधेरी, मालाड, घाटकोपर, कांदिवली बोरीवली, कुर्ला, भांडुप, मुलुंड, टिळक नगर आदी आदी रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे.
(हेही वाचा – Mukhyamantri Teerth Darshan Yojana मध्ये आणखी ११० तीर्थ क्षेत्रांचा समावेश)
महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पोलिस यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार संयुक्तपणे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेत तब्बल एक ते सव्वा महिना ही मोहिम रावबली होती. परंतु गणपतीपूर्वी ही कारवाई थंड पडली आणि तेव्हापासून रेल्वे स्थानकांना भाडोत्री फेरीवाल्यांचा (Hawkers) विळखा अधिक घट्ट होऊ लागला. दादर पश्चिम भागांमध्ये रेल्वे स्थानकाच्या पायऱ्या अडवून व्यवसाय केला जात असून केशवसुत उड्डाणपूलाखालील जागांमध्ये अशाप्रकारे जागा अडवल्या आहेत की त्यामध्ये खरेदी करायला पादचारी किंवा प्रवाशांनाही जाता येणार नाही. त्यामुळे गर्दीतून चालताही येत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त कधी या फेरीवाल्यांवर कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. किमान रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसर फेरीवाला मुक्त करावा अशीच मागणी स्थानिकांकडून केला जात असून महापालिकेला जर ही कारवाई करायची नसेल तर किमान आपल्या गाड्या फिररवून कारवाई करण्याचे नाटक तरी बंद करावे असा त्रागाच रेल्वे प्रवाशी आणि स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community