आज म्हणजेच शुक्रवार ३० जून पासून मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. परिणामी काही भागात वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. तर मुंबईकरांना पाण्यातूनच वाट काढून चालावे लागत आहे. अशातच कांदिवली येथे घरावर स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.
हवामान विभागाने मुंबईला सतर्कतेचा इशारा दिला आहे. पहिल्याच पावसात सर्वत्र पाणी साचले आहे. तसेच अनेक ठिकाणी इमारत,झाड कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांदिवली पूर्वेकडील अशोक नगर परिसरात एका घरावर स्लॅब कोसळून ३५ वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बन डोंगरी येथील, तेलगू समाज सोसायटीतील बाथरूमचा स्लॅब कोसळून एक तरुण गंभीर जखमी झाला. मात्र रुग्णालयात दाखल करतानाच त्याचा मृत्यू झाला.
(हेही वाचा – कोविड सेंटर चौकशीच्या पार्श्वभूमीवर वर प्रशासनाने घेतली सर्व सहायक आयुक्त, डिन, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक)
किशन धुला असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. गुरुवारी (२९ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कांदिवलीच्या अशोक नगर परिसरात बाथरूमचा स्लॅब धुला यांच्या घरावर कोसळला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर धुला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community