मुंबईत मोटारसायकलस्वार सह पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात विनाहेल्मेट मोटारसायकल चालवणारा आणि विना हेल्मेट मागे बसणाऱ्याला प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आणि ३ महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे. मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट वापरणे बंधनकारक अन्यथा कारवाई होणार. 15 दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार आहे, वाहतूक पोलिसांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
हेल्मेट वापरणे बंधनकारक
मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवत असताना, हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट बाईक चालवल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच, 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्यात तरतूद करण्यात आली आहे.
( हेही वाचा: ज्ञानवापीसंदर्भातील नवा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयाकडे; 30 मे रोजी होणार सुनावणी )
अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार
वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना हेल्मेट घालण्याची विनंती करण्यात आली आहे. पुढच्या 15 दिवसांत हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम न पाळणा-यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.