Mumbai High Court : नियमांचे पालन करा; ‘या’ वयानंतर अनुकंपा नोकरी नाही – मुंबई उच्च न्यायालय

मॅटने नियमबाह्य निकाल देऊ नये; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

212
Mumbai High Court : नियमांचे पालन करा; 'या' वयानंतर अनुकंपा नोकरी नाही - मुंबई उच्च न्यायालय
Mumbai High Court : नियमांचे पालन करा; 'या' वयानंतर अनुकंपा नोकरी नाही - मुंबई उच्च न्यायालय

सुवर्णा शिंदे यांचे पती संजय हे कोल्हापूरात तलाठी होते. 10 ऑक्टोबर 2011 रोजी संजय यांचे निधन झाले. (Mumbai High Court) त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर पत्नीला नोकरी देण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ‘अनुकंपा तत्वावरील नोकरी वयाच्या 45 नंतर देता येणार नाही’, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. एका महिलेला दया दाखवून 45 वयानंतरही अनुकंपा तत्त्वाचा लाभ दिला, तर वय उलटून गेलेल्या दावेदारांची नोकरीसाठी रांग लागेल, असे न्यायालयाने या निकालात नमूद केले आहे. ‘नियमांचे उल्लंघन करून मॅटने अनुकंपाचा नोकरीचा एखाद्याला नियमबाह्य लाभ देणे अयोग्य आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Mumbai High Court)

(हेही वाचा – Ajit Pawar : कोल्हापूर शेंडापार्क येथे आयटी पार्क उभारा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)

सुवर्णा शिंदे यांचे पती संजय हे कोल्हापूरात तलाठी होते. 10 ऑक्टोबर 2011 रोजी संजय यांचे निधन झाले. त्यानंतर सुवर्णा यांनी अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला. त्यांचे नाव प्रतिक्षा यादीत होते; मात्र यादरम्यान सुवर्णा यांनी वयाची 45 वर्षे पार केल्याने 7 मे 2011 रोजी त्यांचे नाव प्रतिक्षा यादीतून वगळण्यात आले. त्याविरोधात त्यांनी मॅटमध्ये (Maharashtra Administrative Tribunal) धाव घेतली होती. तेव्हा मॅटनं त्यांचं नाव पुन्हा प्रतिक्षा यादीत टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. याविरोधात प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागताच मॅटचे हे आदेश न्यायालयाने रद्द केले आहेत. (Mumbai High Court)

दया दाखवून सवलत नाही

निकाल देताना न्यायालय म्हणाले, ”अनुकंपा नोकरी देताना नियम डावलता येणार नाहीत. अनुकंपा नोकरीसाठी पात्रतेचे वय हे 18 ते 45 वर्षांपर्यंतच आहे. त्यानंतर अनुकंपा नोकरी देता येत नाही, असा राज्य सरकारचा नियमच आहे. हा नियम मॅटने रद्द केलेला नाही. तो नियम रद्द करण्याचे ठोस कारण नाही. केवळ दया दाखवून एखाद्या प्रकरणात नियमांत सवलत देता येणार नाही. अनुकंपा नोकरी देण्यासाठी राज्य शासनाचे निश्चित धोरण आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.” (Mumbai High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.