१६ मे रोजी रात्री उशिरा तौक्ते वादळ मुंबईत दाखल झाले आणि १७ मे रोजी सकाळपासून मुंबई आणि उपनगरात या चक्री वादळाचे थैमान सुरु आहे. पहाटेपासूनच मुंबईत समुद्र खवळला आहे, त्यामुळे मुंबईत ताशी १००च्या वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे घाटकोपर एक झाड उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हर हेड वायरवर कोसळल्याने आग लागली आणि धीम्या गतीच्या मार्गावरील रेल्वे बंद पडली. तर भेंडी बाजार परिसरात मुसळधार पावसामुळे परिसरात पावसाचे पाणी तुंबले. तर गेट वे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क परिसरातील समुद्र किनाऱ्यावर समुद्राने रौद्ररूप धारण केले होते. अंधेरी सब वे येथे मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी तुंबले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील पत्रे उडून गेले.
(हेही वाचा : ऐन वादळात मुंबईच्या रडारमध्ये बिघाड? )
Join Our WhatsApp Community