Mumbai Hoardings : मुंबईत रात्री अकरानंतर जाहिरात फलकांवर अंधार, महापालिकेसह पोलिसांच्या पथकांची नजर भिरभिरणार

2448

घाटकोपरमधील महाकाय होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत आणि नियमबाह्य फलकांची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, आता ज्या जाहिरात फलकांची लाईट्स रात्री अकरानंतर सुरुच राहिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. जाहिरात फलकांच्या पाहणी करण्यासाठी महापालिकेची पथके तयार केली असून आणि पोलिसांनाही महापालिकेने सुचित करून रात्री अकरानंतर जाहिरात फलकांच्या लाईट्स सुरु राहिल्यास त्यांची जीपीएस फोटो काढून महापालिकेला पाठवावेत अशाप्रकारचे आवाहन केले आहे. त्यामुळे रात्री अकरानंतर आता एलईडी लाईट्स किंवा लाईट्स सुर असल्यास महापालिकेच्यावतीने होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे. (Mumbai Hoardings)

IMG 20240613 WA0002

राज्यातील अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यांसदर्भातील कारवाईबाबत राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या दालनात बुधवारी पार पडली. या बैठकीमध्ये अप्पर मुख्य सचिव (गृह) यांनी असे निदर्शनास आणून दिले की, बरेच प्रकाशित जाहिरात फलक रात्री ११.०० नंतरही प्रदर्शित होत असतात. ही बाब जाहिरात मार्गदर्शक तत्वे २००८ अन्वये भाग-२ कलम १६ (य) (१) चा भंग करणारी आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या क्षेत्रातील रात्रीच्या सत्रात कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना रात्री ११.०० नंतर जाहिरात फलकांची स्थळपाहणी करण्याचे निर्देश यावेळी दिले. (Mumbai Hoardings)

(हेही वाचा – Western and Eastern Expressway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची कामे मुंबई आयआयटीच्या नजरेतून)

पथकाला केल्या ‘या’ सुचना 

या बैठकीच्या अनुषंगाने महापालिकेचे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांच्या स्वाक्षरीने सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि सह आयुक्त (वाहतूक) यांना पत्र पाठवून या तपासणी दरम्यान रात्री ११.०० नंतर जाहिरात फलक प्रकाशित होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर जाहिरात फलकाचा Time Stamp Camera (GPS) व्दारे छायाचित्र काढून संबंधित महानगरपालिका विभाग कार्यालयास पाठविल्यास जाहिरात फलका विरुद्ध नियमानुसार कारवाई करणे शक्य होईल, असे कळवले आहे. (Mumbai Hoardings)

तसेच या बैठकीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या वतीने परवाना विभागाच्या चार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथके तयार केली असून प्रत्येक जाहिरात फलकांचा प्रत्यक्षातील आकार, डिजिटल फलकांचा लाईट्सचे रात्री अकरानंतर बंद होता किंवा नाही हे तपासणे तसेच प्रत्येक फलकाच्या ठिकाणी क्यू आर कोड असून हे कोड स्कॅन केल्यास त्या फलकाची परवानगीची तारीख आणि आकाराची माहिती प्राप्त होऊ शकते, त्यानुसार महापालिकेला कारवाई करणे शक्य होईल, अशाप्रकारच्या सूचना या पथकाला केल्या आहेत. नियमानुसार रात्री अकरानंतर कोणत्याही जाहिरात फलकांच्या लाईट्स सुर असू नये अशाप्रकारचा नियम आहे. परंतु या नियमालाच होर्डिंग मालकांनी हरताळ फासून सकाळपर्यंतही या लाईट्स लावल्या जात असल्याने याबाबत मुख्य सचिवांनी चिंता व्यक्त केली होती. (Mumbai Hoardings)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.