झारखंडमध्ये Mumbai-Howrah Mail चा अपघात; पाच डबे रुळावरून घसरले

123
झारखंडमध्ये Mumbai-Howrah Mail चा अपघात; पाच डबे रुळावरून घसरले
झारखंडमध्ये Mumbai-Howrah Mail चा अपघात; पाच डबे रुळावरून घसरले

झारखंडमध्ये टाटानगरच्या जवळ असलेल्या सरायखेलामध्ये रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. मुंबई-हावडा मेल (Mumbai-Howrah Mail) हावडा येथून (पश्चिम बंगाल) मुंबईला जात होती. या रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार प्रदान केले जात आहेत. तसेच काही रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Sharad Pawar आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत; Prakash Ambedkar यांचा गंभीर आरोप)

हावडा सीएसएमटी एक्सप्रेस, ट्रेन नंबर १२८१० ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील राजखरसावां जंक्शनजवळ रुळावरून घसरली. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीनी या अपघाताबाबत सांगितलं की, रात्री काही प्रवासी रेल्वेस्थानकावर झोपले होते. ३.४५ च्या सुमारास मोठा आवाज आला. आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिले, तर रेल्वे हलताना दिसली. रेल्वे एका बाजूला झुकली होती, काही प्रवासी पडतायत असे वाटत होते. रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचं निदर्शनास आलं.

प्रवाशांसाठी हेल्पलाईन सुरू

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेलं जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. टाटानगर : 06572290324, चक्रधरपूर : 06587 238072, हावडा : 9433357920 व रांची : 0651-27-87115 हे हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की सर्व जखमी प्रवाशांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? या गोष्टींचा तपास केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.