एकाच वेळी ऑफलाईन-ऑनलाईन शिक्षण! शिक्षकांची परवड

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे दिवाळीनंतर राज्य सरकारने इयत्ता ८वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र ५० टक्केच वर्ग भरवण्याचा निर्णय घेतला. बाकी ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सध्या शिक्षकांना एकाच वेळी वर्गात प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे, त्याचवेळी ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांनाही शिकवावे लागत आहे. अशा प्रकारे सध्या हायब्रीड वर्ग सुरु आहेत. मात्र एकाच वेळी दोन्ही स्तरावर शिकवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शाळा अशाच बंद राहिल्या तर विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढेल, म्हणून राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे इयत्ता ८वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. दिवाळीपासून ५० टक्के उपस्थितीत वर्ग सुरु आहेत. त्याचवेळी ५० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात उपस्थितीत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना वर्गात शिकवताना एकाच वेळी वर्गात प्रत्यक्ष उपस्थितीत विद्यार्थांना शिकवावे लागते आणि त्याच वेळी दुसरीकडे ऑनलाईन उपस्थित विद्यार्थ्यांनाही शिकवावे लागत आहे. मात्र अशा प्रकारे वर्ग चालवण्यासंबंधी शिक्षकांना फारसा अनुभव नाही, त्यामुळे शिक्षकांची परवड होत आहे.

ऑनलाईन विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष 

अशा प्रकारे वर्गात शिकवतात शिक्षकांचे ऑनलाईन पद्धतीने वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असते, त्या विद्यार्थ्यांना फारसे समजत नाही. विशेष म्हणजे गणित विषय शिकवताना शिक्षकांचा गोंधळ होत आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांशी संवाद होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे काही शाळांनी आता थेट ऑनलाईनच वर्ग चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here