मुंबई – हैदराबाद एक्सप्रेसने प्रवास होणार अधिक सुसाट; १ ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक लागू

137

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने 17032/17031 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाद या एक्स्प्रेसचा १ ऑक्टोबरपासून वेग वाढवण्याचा आणि या एक्स्प्रेसचा क्रमांक 22731/22732 असा पुनर्क्रमित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्यानंतर मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसच्या वेळपत्रकात आणि गाडी क्रमांकामध्ये बदल झाला असून, याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरु झाली आहे, अशी माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली. प्रवाशांसाठी आता ही खुशखबर असून या गाडीला प्रवाशांची मोठी गर्दी होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसचा आता सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाला आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबई- सोलापूर- हैदराबाद दरम्यान धावणारी गाडी आता ‘मुंबई- हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस’ या नावाने ओळखली जाईल. याशिवाय मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचा क्रमांकही बदलला आहे. प्रचलित असलेल्या १७०३१ आणि १७०३२ या क्रमांकाऐवजी २२७३१ आणि २२७३२ या नव्या क्रमांकाने ही गाडी धावणार आहे. या गाडीतून हैदराबादला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर आणि वेगवान होणार आहे.

मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक व क्रमांक

22732 हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दिनांक 01 ऑक्टोबर 2022 पासून 14.10 वाजता (सध्याच्या वेळेप्रमाणे) सुटेल आणि हैदराबाद येथे दुसऱ्या दिवशी 05.30 ऐवजी 04.30 वाजता पोहोचेल.

22731 हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस हैदराबाद येथून दिनांक 01 ऑक्टोबर 2022 पासून 20.55 ऐवजी 22.35 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 13.05 वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, सोलापूर जंक्शन, दुधनी, कलबुरगि, वाडी, चित्तापूर, सेरम (फक्त 22731 साठी), तंदूर, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, असे रेल्वेने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.