‘जुडेगा भारत और जितेगा इंडिया’ हा आमचा नारा आहे. आमचा लढा हुकूमशाहीच्या आणि जुमलेबाजीच्या विरोधात आहे. निवडणुकीच्या वेळी नारा दिला जातो सबका साथ हा विकास हा नारा दिला जातो. निवडणूक जिंकल्यावर नारा असतो मित्रोंका साथ और सबको लाथ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीत हल्लाबोल केला.
इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला 13 सदस्यीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. इंडियाची बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपलं मनोगत मांडलं. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात बैठकीसाठी आलेल्या सगळ्या नेत्यांचं स्वागत करून ते म्हणाले, आमची विरोधकांची एकजूट नाही तर आम्ही सगळे देशप्रेमी एकत्र आलो आहोत. इंडिया हे नाव आम्ही घेतलं आहे. आता देशावर प्रेम न करणारे कोण हे सगळ्यांना माहित आहे. हुकूमशाहीच्या विरोधात, मनमानीच्या विरोधात आणि मित्र परिवारवादाच्या विरोधातही आम्ही लढणार आहोत. कारण सबका साथ सबका विकास हा नारा दिला जातो, पण विकास फक्त मित्रांचा केला जातो तसेच गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या म्हणत आहेत, मात्र २०१४ पासून या किंमती पहिल्यांदा हे दर कमी केले. हजार रुपये वाढवायचे आणि २०० रुपये कमी करायचे याला काय अर्थ आहे? पाच वर्षांत लूट आणि निवडणुकीच्या वेळी सूट हे काय कामाचं गॅस सिलिंडर स्वस्त केला पण त्यावर शिजवणार काय? डाळ महाग आहे, भाज्या महाग आहेत त्याकडे कोण लक्ष देणार? लोकांना हे सगळं समजतं आहे.