विमानतळ परिसरातील आकाश मोकळे ठेवण्याची सक्ती!

विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

214

मुंबईतील महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील आकाश मुक्त ठेवावे असा सक्तीचा आदेश मुंबई पोलिसांनी काढला आहे. विमानतळाच्या उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, मोठे फुगे (बलून), उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) द्वारे विमानांच्या लँडींग, टेक ऑफ तसेच उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध केला आहे. 19 ऑगस्ट  2021 पर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी कारवाई!

याबाबतचा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबई पोलिस उपआयुक्त (अभियान) यांनी जारी केले आहेत. विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात अशा प्रकारच्या वस्तू तसेच लेसर प्रकाश सोडण्याचा प्रकार करुन विमान जमिनीवर उतरण्यास (लँडींग), विमानाच्या उड्डाणात (टेक-ऑफ) या कार्यात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. विमान उड्डाण कार्यात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुंबई पोलिस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, एस.चैतन्य यांनी हे आदेश निर्गमित केले आहे.

(हेही वाचा : सावधान! म्युकरमायकोसिस आता कोरोनाला मागे टाकतोय!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.