जगभरात मुस्लिमांनी ‘हलाल’च्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. भारतातही याचे स्तोम माजले आहे. हलाल उत्पादनांच्या प्रचार प्रसारासाठी मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे ‘इंटरनॅशनल हलाल शो’चे आयोजन करण्यात आले होते. त्याला विरोध करण्यासाठी हिंदू जनजागृती समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अन्य हिंदुत्वादी संघटनांनी ‘हलाल विरोधी कृती समिती’ स्थापन केली होती. त्यानंतर समितीच्या माध्यमातून राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून अखेर ‘हलाल शो’ रद्द करण्यात आला.
हलाल विरोधी कृती समिती स्थापन
ज्यावेळी मुंबईत हलाल उत्पादनांच्या प्रसारासाठी ‘इंटरनॅशनल हलाल शो’चे आयोजन करण्यात आले आहे, असे वृत्त समजताच हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. हा ‘हलाल शो’ रद्द करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे हिंदू जनजागृती समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने ९ ऑक्टोबर रोजी हलाल विरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘हलाल शो’ ला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. तसेच या परिषदेत हलाल विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली.
(हेही वाचा मुंबईतील ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ रद्द करा, हलाल सक्तीविरोधी कृती समितीची मागणी)
अखेर ‘हलाल शो’ला परवानगी नाकारली
यानंतर लागलीच ‘हलाल फ्री दिवाळी’ हे आंदोलन करण्यात आले. दिवाळीमध्ये हलाल सर्टिफिकेट असेलेल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आले. याकरता जागोजागी आंदोलने करण्यात आली. त्यानंतर इस्लाम जिमखान्यात १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘इंटरनॅशनल हलाल शो’ला विरोध करण्यासाठी मागील आठवड्यापासून आंदोलन सुरु करण्यात आले. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. याचा परिणाम म्हणून अखेर ‘हलाल शो’चे ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आले, त्या इस्लाम जिमखाना यांनी ‘हलाल शो’ ला परवानगी नाकारली. या ‘इंटरनॅशनल हलाल शो २०२२’ मध्ये ‘मुस्लिम-अनुकूल’ रुग्णालये, हलाल ई-कॉमर्स, हलाल पर्यटन, व्याजमुक्त वित्त, हलाल हॉस्पिटॅलिटी आणि खाद्यपदार्थांपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत हलाल उत्पादनांमध्ये व्यवहार करणाऱ्या १०० हून अधिक व्यवसायिकांनी भाग घेणे अपेक्षित होते. मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी याला जोरदार विरोध केल्यामुळे अखेर इस्लाम जिमखाना यांनी या ‘हलाल शो’ ला परवानगी नाकारली. काही संघटना ‘हलाल शो’ आयोजित करण्यास विरोध करत आहेत आणि आम्ही कायदा आणि सुव्यवस्था, शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी तो रद्द केला आहे. या कार्यक्रमाला परवानगी देणे शहाणपणाचे नाही, असे इस्लाम जिमखानचे अध्यक्ष युसूफ अब्राहनी यांनी सांगितले.
(हेही वाचा तुम्ही हिंदू असाल तर हलाल का खाणार? जाणून घ्या हलाल पदार्थांची यादी…)
Join Our WhatsApp Community