पावसाळ्याच्या दिवसांत जुहू समुद्रकिनाऱ्यावर वारंवार डांबराचे गोळे पडत आहेत. हे डांबराचे गोळे सापडण्यामागे नेमके कारण शोधून काढण्याकरिता विविध प्रश्नांचा मागोवा सध्या घेतला जात आहे. समुद्रातील प्रदूषण वाढत आहे का की नैसर्गिक स्त्रोत आहे; हे तपासण्याकरिता प्रयोगशाळेत या गोळ्यांची तपासणी करण्यात येते का, असा प्रश्न काही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
समुद्रातील कचरा पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रकिनाऱ्यावर वाहून येतो. या कचऱ्यात वाहून आलेले डांबराचे गोळेही सतत दिसत असतात, अशी माहिती जुहू येथील सुनील कनोजिया यांनी केली होती.याविषयी त्यांचे म्हणणे आहे की, डांबरगोळे समु्द्रातील नैसर्गिक तेलस्त्रोत, जहाज धुणे, तेलवाहतूक, जहाजातील तेलगळती यामुळे येतात का? याविषयी परदेशातील समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या डांबराच्या गोळ्या ज्याप्रमाणे अभ्यास करून विश्लेषण केले जाते, त्याप्रमाणे आपल्याकडे समुद्र प्रदूषणाच्या घटनांबाबत काय निर्णय घेतले जातात,अशी विचारणा त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. यावर मंडळाकडून लवकरच हे समुद्र प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – China’s New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले … )
डांबरगोळ्यांची विक्री
डांबर गोळे समुद्रातील प्रदूषणामुळे निर्माण होतात. ही फक्त पावसाळ्यातील समस्या नाही.पावसाळ्यात समुद्राच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात घुसळण होते.या घुसळण प्रक्रियेमधून हे गोळे निर्माण होऊ शकतात. इतर वेळीही समुद्र त्याच्या पोटातील घाण किनाऱ्यावर फेकून देत असल्याने हे गोळे किनाऱ्यावर दिसू शकतात. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यास करण्यात आला आहे, मात्र भारतात हा पदार्थ विषारी आहे याची माहिती नसल्याने भारतात समुद्रकिनाऱ्यांवर आलेले डांबर गोळे जमा करून विकण्याचेही प्रकार होतात, असे क्लायमेट रिअॅलिटी प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक प्रा. डॉ. नंदिनी देशमुख यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community