Mumbai Local: मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच

273

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे लोकलमधून (Mumbai Local) पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. मात्र याचे प्रमाण आता वाढतच चालले आहे. या पार्श्वभुमीवर मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. (Mumbai Local)

या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची

आता गर्दीमुळे लोकलमधून पडून झालेला मृत्यू हा अपघातच असल्याचे मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) स्पष्ट केले. तसंच, या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असून भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. गर्दीमुळे जर एखाद्याचा लोकल ट्रेनमधून (Mumbai Local) पडून मृत्यू होत असेल तर तो अपघातच असल्याचे म्हटले आहे. या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.त्याचसोबत तीन महिन्यात भरपाई दिली नाही तर १२ टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे. (Mumbai Local)

(हेही वाचा –Cloudburst Rain: चिपळूणमध्ये पावसाचा कहर! अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस)

लोकल ट्रेनमधून (Mumbai Local) पडून मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन महिन्यांमध्ये लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ११ मे रोजी लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. कल्याणवरून सीएसएमटीकडे जलद लोकलने जात असताना ही घटना घडली. मुंब्रा- कळवा स्थानकादरम्यान पारसिक बोगद्याजवळ पडून २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. (Mumbai Local)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.