ठाण्यात तांत्रिक बिघाडामुळे लोकलचा खोळंबा, पाऊण तास मध्य रेल्वे ठप्प

ठाणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली

89
ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे कांजूरमार्गपर्यंत लोकल तब्बल पाऊण तासापासून एका मागोमाग एक गाड्या थांबलेल्या आहेत. यामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. कार्यालये सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

ठाणे स्थानकात पाऊण तासापासून एकही ट्रेन सुटली नाही

या खोळंब्यामुळे ठाणे कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या मुलुंड स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत, या बिघाडामुळे काजूंरमार्ग स्थानकापर्यंत गाड्या खोळबंल्याची माहिती मिळत आहे. तर लोकल उशिराने असल्याने ठाणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच कल्याण स्थानकातही प्रवासी लोकलच्या प्रतिक्षेत थांबलेले दिसत आहेत. गाड्या खोळंबल्याने ठाणे स्थानकात इतकी प्रचंड गर्दी झाली आहे, की चेंगराचेंगरीची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे स्थानकात तब्बल पाऊण तासापासून एकही ट्रेन सुटली नव्हती. मुलुंड येथून कल्याणच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल स्लो ट्रॅकवर जात होती. मात्र त्याच वेळी काही तांत्रिक बिघाड झाला आणि ती ट्रेनमध्येच अडकली. याचाच फटका इतर लोकल वाहतुकीवर झाला. डाऊन स्लो, अप स्लो आणि डाऊन फास्ट तिन्ही मार्ग बंद पडले. त्यानंतर ठाण्यातून डोंबिवलीला जाणारी लोकल तब्बल पाऊण तासाने सोडण्यात आली.

(हेही वाचा मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारने केलेला करार मोडला!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.