मध्य रेल्वेचा ६३ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक अखेर संपला. ठाण्याहून पहिली लोकल सीएसएमटीकडे दुपारी २ वाजता धावली. प्रवाशांनी केलेल्या सहकार्यामुळे मध्य रेल्वेने मुंबईकरांचे आभार मानले आहेत.
तीन दिवसांचा मेगा ब्लॉक संपताच सीएसएमटी स्थानकातून लोकल धावू लागल्या. विशेष ब्लॉक आणि मोठ्या पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर, सीएसएमटीहून पहिली लोकल दुपारी १ वाजून १० मिनिटांनी धावली.
(हेही वाचा – Exit Poll 2024 जाहीर होताच पंतप्रधान मोदींच्या दिवसभरात मॅरेथॉन बैठका!)
अखेर मध्य रेल्वेवरील Central Railway) ३ दिवस चालणारा महा जम्बो मेगा ब्लॉक संपला (Maha Jumbo Mega Block) आहे. सी. एस. एम. टी. (CSMT) पासून स्थानिक सेवा (Local Services) सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या ३ दिवसांपासून त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सी. एस. एम. टी. (CSMT Railway Station) रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सेवा (Train Services) पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ६३ तासांचा मेगा जंबो मेगा ब्लॉक होता. रेल्वेने मध्य रेल्वेवरील सीएसएमटी फलाट क्रमांक १० आणि ११ आणि ठाणे स्थानकावर ५ आणि ६चे रुंदीकरणाचे काम दुपारी पूर्ण झाले. त्यानंतर लोकल सेवा सुरू झाली.
ठाणे आणि सी. एस. एम. टी. रेल्वे स्थानकांवर फलाट रुंदीकरण
जम्बो मेगा ब्लॉकदरम्यान उपनगरीय मार्गावरील ९३० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ३३ लाखांहून अधिक प्रवाशांना याचा फटका बसला होता. मध्य रेल्वेने ठाणे स्टेशनवरील फलाटाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी ३०/३१ मेच्या मध्यरात्रीपासून २ जूनच्या दुपारपर्यंत६३ तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला होता. तसेच सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी ३०/३१ मेच्या मध्यरात्रीपासून २ जून रोजी दुपारपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community