Mumbai local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वे आता धावणार ‘टाइम टू टाइम’

1649
Mumbai local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वे आता धावणार ‘टाइम टू टाइम’

मध्य रेल्वे (Centrail Railway) मार्गावर मागील काही दिवसांपासून लोकल रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे प्रवाशांना यांचा फटका बसतो. सीएसएमटी स्थानकात बसविण्यात आलेल्या आधुनिक नविन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेच्या नियमामुळे लोकल वाहतुकीची यंत्रणा कोलमडली होती. सदर यंत्रणेत रुळांवरील क्रॉसओव्हर संबंधित नियम शिथील करण्याची मागणी मध्य रेल्वेने, रेल्वे बोर्डाकडे केली होती. त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून आता नव्या यंत्रणेत पुर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून ७० मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा वेळापत्रकानुसार धावणार असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai local)

सीएसएमटी रेल्वे (CSMT Railway Station) स्थानकातून लांबपल्याच्या २४ डब्याचा मेल एक्स्प्रेस गाड्या चालविण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक १० ते ११ चे विस्तारीकरण केले आहे. त्याचबरोबर मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची हाताळणी सुरक्षित आणि संगणकीकृत प्रणालीतून व्हावी, यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा (Electronic interlocking mechanism) सीएसएमटीमध्ये लावली आहे. (Mumbai local)

ही यंत्रणा बसविल्यापासून म्हणजेच २ जून २०२४ पासून रोजच लोकलची वाहतूक १५ ते २० मिनिटे विलंबाने हाेत आहे. लोकलचे वेळापत्रक सुरळित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन रोज काही लोकल रद्द करत असल्याने गाड्यांना गर्दी वाढते आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु होते. सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्याल्या मेल-एक्स्प्रेस धावतात. दिवसाला सुमारे १४०० लोकल आणि १०० पेक्षा जास्त मेल- एक्स्प्रेस स्थानकातून ये-जा करतात. या गाड्यांना लवकर सिग्नल मिळत नसल्याने लोकलच्या वाहतूकीचे मात्र तीनतेरा वाजले आहेत. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

काय होती अडचण? 

रेल्वे बोर्डाच्या सिग्नल अॅड टेलिकॉम विभागाच्या (Department of Signals and Telecom) परिपत्रकानुसार रुळांवरील क्रॉसओव्हरवरून एक गाडी २५० मीटर पुढे गेल्यानंतरच त्या रेल्वे रुळांवरुन दुसरी गाडी पुढे जाऊ शकत होती. त्यातच क्रॉसओव्हरवर निर्धारित केलेल्या १५ किमी प्रतितास वेग मर्यादेसह अंतर पार करण्यासाठी प्रत्येक मेल एक्स्प्रेसला निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागायचा. (Mumbai local) त्याचा परिणाम लोकल सेवेवर होत होता. सीएसएमटी – कुर्ला दरम्यान पाचवा-सहावा रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस आणि लोकलकरिता स्वतंत्र मार्गिका नाही. एकाच अप-डाउन जलद मार्गावरुन लोकल आणि मेल- एक्स्प्रेसची वाहतूक होते. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवरमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या मेल-एक्स्प्रेसची संख्या पाहता याचा थेट परिणाम लोकलच्या सेवेवर होतो. मात्र, आत रेल्वे बोर्डाने नियम शिथिल केला आहे. (Mumbai local)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.