अलिकडे मुंबईतील लोकल दररोज विलंबाने धावत आहेत याचा फटका मुंबईकर प्रवाशांना बसत आहे. परंतु लोकल उशिराने धावण्याचे नेमके कारण काय आहे यासंदर्भात आपण जाणून घेऊया…
( हेही वाचा : T-20 World Cup : इंग्लंडने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय; ओव्हलच्या मैदानात ज्या संघाने नाणेफेक जिंकली त्याच संघाने गमावले सामने)
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावत असल्याचे कारण समोर येत आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या सिग्नल बिघाडामुळे दिवसभरात १०४ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा नोव्हेंबर महिन्यात सातत्याने सामना करावा लागत आहे.
पश्चिम रेल्वेवर नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या बिघाडाच्या घटना
४ नोव्हेंबर – गोरेगाव स्थानकाजवळ सकाळी ६.२० वाजता बिघाड
४ नोव्हेंबर – मुंबई सेंट्रल स्थानकात रात्री ९.१० वाजता धीम्या मार्गावर सिग्नल बिघाड
७ नोव्हेंबर – वैतरणा आणि विरारदरम्यान पहाटे ५.४५ वाजता जलद मार्गावर सिग्नल बिघाड
९ नोव्हेंबर – सकाळी ८.४६ वाजता गोरेगाव स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड
मध्य रेल्वेच्या विलंबाची कारणे
सिग्नल, ओव्हरहेड वायर, पेन्टोग्राफ, गाडीतील बिघाड अशी कारणे लोकलच्या विलंबाला कारणीभूत आहेत. तसेच आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशांना गाडी थांबवता यावी यासाठी लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये साखळी असते. मात्र याचा विनाकारण वापर काही प्रवाशांकडून केला जातो. या घटनांमुळे सुद्धा लोकल किंवा मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बिघडते.
Join Our WhatsApp Community