Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा! मध्य-हार्बरवर होणार खोळंबा

170
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा! मध्य-हार्बरवर होणार खोळंबा
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, उद्या नियोजन करूनच घराबाहेर पडा! मध्य-हार्बरवर होणार खोळंबा

ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक (Mumbai Local Mega Block) घोषित केला आहे. मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. (Mumbai Local)

(हेही वाचा –By-Election Voting : नगरपरिषद व नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्टला मतदान)

ब्लॉकवेळेत अप आणि डाउन मेल-एक्स्प्रेस जलद मार्गावरून धावतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. १९ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांसह काही लोकल फेऱ्या ही विलंबाने धावणार आहेत. वसई रोड-दिवा- वसई रोड मेमू कोपरपर्यंतच धावणार असल्याने कोपर ते दिवा दरम्यान मेमू फेऱ्या रद्द राहतील. रत्नागिरी -दिवा पॅसेंजर पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. (Mumbai Local Mega Block)

(हेही वाचा –सन २०२७ मध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल; Amitabh Kant यांचा विश्वास)

सीएसएमटी ते पनवेल बेलापूर वाशीदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळ लोकल सुरू राहणार आहेत. ब्लॉकवेळेत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेणार असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. (Mumbai Local Mega Block)

मध्य रेल्वे
स्थानक – ठाणे ते दिवा
मार्ग – पाचवा ते सहावा
वेळ – सकाळी १०.५० ते दुपारी ३.२०

हार्बर रेल्वे
स्थानक – कुर्ला ते वाशी
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११ .१० ते दुपारी ४ .१०

पश्चिम रेल्वे
स्थानक – मुंबई सेंट्रल ते माहीम
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२ .१५ ते रविवारी पहाटे ४ .१५

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.