Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेवरील ५३४ फेऱ्या रद्द! ३७ मेल-एक्स्प्रेस रद्द

113
Central Railway Megablock: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रविवारी दुपारी संपणार, 'या' स्थानकांपर्यंतच धावणार लोकल ट्रेन; जाणून घ्या
Central Railway Megablock: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रविवारी दुपारी संपणार, 'या' स्थानकांपर्यंतच धावणार लोकल ट्रेन; जाणून घ्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे (Thane) येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी (Mumbai Local Mega Block) गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या महामेगाब्लॉक (Mega Block) मध्य रेल्वेवरील (Central Railway) प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आज, शनिवारी (1 जून) त्यात आणखी भर पडणार आहे. लोकलच्या तब्बल 534 फेऱ्या रद्द होणार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Mumbai Local Mega Block)

(हेही वाचा –Pune Porsche Acident प्रकरणी शिवानी अग्रवाल पोलिसांच्या ताब्यात!)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 10 आणि11 च्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून (Central Railway) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 930 लोकल फेऱ्यांसह 72 मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज सर्वाधिक लोकल रद्द आहेत, तर परेल, दादर आणि भायखळा पर्यंतच मध्य रेल्वे धावत आहे, त्यामुळे 20 ते 25 मिनिटांच्या फरकाने लोकल ठाणे स्थानकात येत आहेत. (Mumbai Local Mega Block)

पश्चिम रेल्वेवरील 2 जूनचा ब्लॉक रद्द

मध्य रेल्वेने सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी महामेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असताना रविवारच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे अधिक हाल होऊ नये, यासाठी रेल्वेने उद्या 2 जून रोजी घेण्यात येणारा पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जून रोजी या गाड्या अप रद्द

1) 11010 : पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
2) 12124 : पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस
3) 12110 : मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
4) 12126 : पुणे-सीएसएमटी प्रगति एक्सप्रेस
5) 20705 : जालना- सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
6) 11012 : धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
7) 11008 : पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
8 ) 12128 : पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
9) 17618 : नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस
10) 22226 : सोलापूर-सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
11) 22230 : मडगाव-सीएसएमटी वंदेभारत एक्सप्रेस
12) 22120 : मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस
13) 12702 : हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्सप्रेस
14) 17412 : कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस
15 ) 17611 : नांदेड-सीएसएमटी राज्यरानी एक्सप्रेस

1 जनू रोजी या डाऊन गाड्या रद्द

1) 17617 : सीएसएमटी- नांदेड तपोवन एक्सप्रेस
2) 22119 : सीएसएमटी- मडगाव तेजस एक्सप्रेस
3) 12127 : सीएसएमटी-पुणे प्रगति एक्सप्रेस
4) 11007 : सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस
5 ) 11011 : सीएसएमटी-धुळे एक्सप्रेस
6) 20706 : सीएसएमटी-जालना वंदेभारत एक्सप्रेस
7) 22225 : सीएसएमटी-सोलापूर वंदेभारत एक्सप्रेस
8) 12125 : सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस
9) 12123 : सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
10) 11009 : सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस
11) 12109 : सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्सप्रेस
12) 17612 : सीएसएमटी-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
13) 12111 : सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस
14) 12289 : सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस
15) 17411 : सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
16) 12701 : सीएसएमटी-हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.