लोकल ट्रेन (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. अशातच आता मध्ये रेल्वेकडून या या लोकलच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे आता नागरिकांच्या प्रवासाला वेगळी गती मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्ये रेल्वेकडून (Mumbai Local) जलद लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर आता CSMT अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ४:३५ मिनिटांनी पहिली जलद लोकल सोडली जाणार आहे. उद्यापासून म्हणजेच १० ऑगस्ट, गुरुवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. CSMT स्थानकावरून याआधी पहिली फास्ट लोकल (Mumbai Local) पहाटे ५:२० मिनिटांनी होती. मात्र आता ही लोकल जवळपास ४० ते ४५ मिनिटं आधीच सुटणार असून, ही लोकल सीएसएमटीहून खोपोलीपर्यंतच्या मार्गावर चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
(हेही वाचा – Rain : मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या ‘या’ भागाला यलो अलर्ट)
लोकलच्या (Mumbai Local) वेळापत्रानुसार ‘सीएसएमटी’हून सकाळी ४:१९ वाजता लोकल वाहतूक सुरू होते. पहिली कसारा लोकल ४:१९ वाजता तर, पहिली जलद लोकल कल्याणसाठी ५:२० मिनिटांनी सुटते. मात्र, ही AC लोकल असल्यामुळं साध्या जलद लोकलसाठी सर्वसामान्यांना ५:४६ च्या कर्जत जलद लोकलची वाट पाहावी लागते. यामुळे लोकल (Mumbai Local) सुरू झाल्यानंतर तब्बल दीड तास प्रवाशांना जलद लोकलसाठी वाट पाहावी लागते. आता मात्र हे चित्र बदलणार आहे. त्यामुळे नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community