UTS ॲपद्वारे ५ किलोमीटर अंतरावरून काढता येणार लोकलचे तिकीट; जाणून घ्या नवे नियम

तिकिटांचे बुकिंग, ट्रेनची धावण्याची स्थिती, पीएनआर स्थिती, रिशेड्यूल्ड ट्रेन्स इत्यादी ट्रेनशी संबंधित माहिती घेण्यासाठी रेल्वे प्रवासी यूटीएस ॲपचा वापर करतात. UTS ॲपद्वारे प्रवासी रेल्वेचे तिकीट घर, कार्यालय, दैनंदिन प्रवास करताना अगदी कुठेही सहज बुक करू शकतात. परंतु यापूर्वी UTS मधून फक्त २ किमी अंतरावरून रेल्वेचे तिकीट काढता यायचे. यामुळे बहुतांश प्रवाशांची गैरसोय होत होती याच पार्श्वभूमीवर तिकीट बुक करण्यासाठी अंतराच्या निर्बंधात शिथिलता द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती.

( हेही वाचा : T20 World Cup: प्लेअर ऑफ टूर्नामेंटसाठी ९ नावे जाहीर! भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश, येथे करा VOTE )

नवे नियम

रेल्वेने खालीलप्रमाणे युटीएस मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे…

उपनगरीय तिकिटांसाठी विद्यमान २ किमीवरुन ५ किमी अंतर करण्यात आले आहे.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांसाठी विद्यमान ५ किमीवरुन २० किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले आगे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

2022-23 दरम्यानच्या कालावधीत प्रवाशांकडून UTS ॲपचा वापर हळूहळू वाढला आहे. या ॲपद्वारे काढण्यात आलेल्या तिकिटांची दैनंदिन सरासरी 36 हजारवरून सप्टेंबर 2022 मध्ये (27 सप्टेंबर 2022 पर्यंत) 74 हजार एवढी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here