१२ डब्यांची लोकल ते तेजस एक्स्प्रेस; असा आहे मध्य रेल्वेचा ७१ वर्षांचा प्रवास

207

मध्य रेल्वेला ७१ वर्ष पूर्ण होत असून आता मध्य रेल्वे ७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांनी रेल्वे प्रवासी व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आशियातील पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवारी, १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. सन १९०० मध्ये जीआयपी रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली. अशा प्रकारे, मुंबईद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. जीआयपी चे रेल्वेमार्ग 1,600 मायलेज (2575 किमी) होते.

( हेही वाचा : विराट कोहलीने जिंकले सर्वांचे मन; भारताच्या विजयानंतर बांगलादेशच्या हॉलमध्ये गेला अन् घडले असे…)

५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किमीवर पसरलेले आहे आणि एकूण ४७१ स्थानके आहेत.

मध्य रेल्वेने गेल्या ७१ वर्षांत अनेक कामगिरी पहिल्यांदाच केली आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरी आहेत: पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस हि काही नावे आहेत. मध्य रेल्वे सतत विकासात आघाडीवर आहे. मूळ लोडिंग जे निर्मितीच्या वेळी १६.५८ दशलक्ष टन होते, ते आता २०२१-२२ मध्ये ७६.१६ दशलक्ष टन झाले आहे. २०२२-२३ मध्ये, मध्य रेल्वेने ४३.९७ दशलक्ष टन लक्ष्य गाठले जी एप्रिल-ऑक्टोबर दरम्यानची सर्वात चांगली मालवाहतूक लोडिंग आहे. उपनगरीय सेवा देखील १९५१ मधील ५१९ सेवांवरून वरून २०२२ मध्ये १८५० (मुंबई १८१० आणि पुणे ४०) पर्यंत वाढल्या आहेत.

मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून आज चार कॉरिडॉर आहेत. ३ डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वे लाईनचे निर्माण, दुहेरीकरण, तिसरी व चौथी लाईन, विद्युतीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.

मध्य रेल्वेने मान्सूनपूर्व मोठ्या प्रमाणात कामे केली असून त्यामुळे मुसळधार पाऊस होऊनही उपनगरीय गाड्या धावत होत्या. अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक म्हणाले की, या वर्षी मध्य रेल्वेने आतापर्यंत विक्रमी १५८ किमीचे मल्टीट्रॅकिंग पूर्ण केले आहे. २०१९ मध्ये अभूतपूर्व पावसामुळे नेरळ-माथेरान सेक्शनवर झालेल्या नुकसानीनंतर, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.