Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात, लोकलचा डबा रुळावरून घसरला

180
Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात, लोकलचा डबा रुळावरून घसरला
Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात, लोकलचा डबा रुळावरून घसरला

मध्य रेल्वेवरील टिटवाळा सीएमटी लोकलच्या गार्डचा डब्बा रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. डब्बा घसरल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. डब्बा रुळावर आणण्याचे प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरु आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. येत्या अर्धा तासात हा डब्बा दुर करून रेल्वे वाहतुक सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिली आहे. (Mumbai Local train )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.