Mumbai Local Train : दर रविवारी मेगाब्लॉक घेवूनही सलग दुसऱ्या आठवड्यात हार्बर लाईन ठप्प

139
Mumbai Local Train : दर रविवारी मेगाब्लॉक घेवूनही सलग दुसऱ्या आठवड्यात हार्बर लाईन ठप्प
Mumbai Local Train : दर रविवारी मेगाब्लॉक घेवूनही सलग दुसऱ्या आठवड्यात हार्बर लाईन ठप्प

मागील आठवड्यात वाशी येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर लाईन ऐन कार्यालयीन वेळेत ठप्प झाली होती. प्रवाशांना रुळावर उतरून चालावे लागले होते, आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पुन्हा बेलापूर रेल्वे स्थानकाकडे ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर लाईन पुन्हा ठप्प झाली आहे. प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. विशेष म्हणजे दर रविवारी हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेतला जातो, तरीही अशा तांत्रिक अडचणी का निर्माण होतात, असा प्रश्न प्रवासी करू लागले आहेत.  (Mumbai Local Train)

(हेही वाचा- Bangladesh Hindu : बांगलादेशात दुर्गा पूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना; हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण)

रेल्वे ठप्प झाल्याचे लक्षात येताच स्थानकाबाहेर रिक्षचालकांनी वाशी, बेलापूर भाडी घेणे सुरू केले, पनवेल ते वाशी थेट स्पेशल बुक केली तर ५०० रुपये आणि शेअरिंग मध्ये प्रत्येकी १५० रुपये भाडे आकाराने सुरू केले. विशेष म्हणजे जेंव्हा मेगब्लोक असतो तेव्हा हेच भाडे १०० रुपये असते. (Mumbai Local Train)

बेलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे पनवेलकडे आणि सीएसएमटी जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा ठप्प राहणार आहे. मात्र, पनवेलकडे जाणारी वाहतूक सुरु झाली आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे हार्बर लाईनवर प्रवशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यांना मनस्ताप सहन कराला लागत आहे. (Mumbai Local Train)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.