मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे (Mumbai Local Train) बेस्ट प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. महाजम्बो ब्लॉकचा परिणाम शुक्रवारी (३१ मे) सकाळपासूनच सर्व रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाच्या (BEST Bus) वतीने बस सोडल्या गेल्या आहेत. नियोजित वेळापत्रकाशिवाय, तसेच जशी गरज भासेल त्याप्रमाणे प्रत्येक आगारातून गाड्या सोडल्या जातील. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय होणार नाही. (Mumbai Local Train)
(हेही वाचा –Monsoon चा पाऊस हवामान विभाग कोणत्या निकषांवर ओळखते ?)
संपूर्णपणे लोकल ट्रेनवर (Mumbai Local Train) अवलंबून असलेल्या मुंबईकरांना बेस्टच्या या सुविधेचा कितपत फायदा होणार, याबाबत शंकाच आहे. याशिवाय, ठाणे आणि कल्याण परिसरात एसटी महामंडळाकडूनही प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. (Mumbai Local Train)
कोणत्या भागांमध्ये अतिरिक्त बसेसची व्यवस्था?
CSMT ते दादर स्थानक 4 बसेस 80 फेऱ्या
कुलाबा आगर ते भायखळा स्थानक 4 बसेस 80 फेऱ्या
कुलाबा अगर ते वडाळा स्थानक 4 बसेस 72 फेऱ्या
कुलाबा आगर ते वडाळा स्थानक चार बसेस 30 फेऱ्या
CSMT ते धारावी आगार 5 बसेस 30 फेऱ्या
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षा नगर पाच बसेस 20 फेऱ्या
बॅकबे आगार ते एम एम आर डी ए वसाहत माहुल 5 बसेस 20 फेऱ्या
कुलाबा आगार ते खोडदाद सर्कल पाच बसेस 30 फेऱ्या
सी एस एम टी ते भायखळा स्थानक तीन बसेस 24 फेऱ्या
राणी लक्ष्मी चौक ते दादलानी पार्क पाच बसेस 20 फेऱ्या
सीएसएमटी ते भायखळा स्थानक पाच दुमजली बसेस 40 फेऱ्या
अँटॉप हिल ते वीर कोतवाल उद्यान पाच बसेस 40 फेऱ्या
हेही पहा –
Join Our WhatsApp Community