लोकल ने प्रवास करताय? मग जाणून घ्या… गुरुवारपासून होणार ‘हा’ बदल

83

उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आता गुरुवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात १००% चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त पत्रक काढून ही माहिती दिली आहे. मात्र,शासनाने निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

२२. मार्च २०२० पासून कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५.जून २०२० पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या. उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट २०२१ मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या होत्या.

सध्या, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात १७०२ आणि १३०४ उपनगरीय सेवा चालवत आहेत, ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या ९५.७०% आहे.

गुरुवारी २८ ऑक्टोबर २०२१ पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर १००% उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर १७७४ आणि पश्चिम रेल्वेवर १३६७ सेवा चालवल्या जाणार आहेत .फक्त राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या एसओपी नुसार प्रवास करण्याची परवानगी असेल असेही त्यांनी या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.