मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी, रात्री ९.४५ वाजता दोन एक्स्प्रेस एकाच ट्रॅकवर आल्या. पदुचरी एक्स्प्रेस सीएसएमटीच्या दिशेने जात होती, त्याचवेळी कल्याणच्या दिशेने येत असलेली गदग एक्स्प्रेस ट्रॅक क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या. यावेळी गाडीची धडक होऊ नये म्हणून पदुचरी एक्स्प्रेसच्या मोटरमनने तातडीचा ब्रेक लावला. त्यामुळे या गाडीचे तीन डबे बाजुला कलंडले. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. घसरलेले दोन डबे पुन्हा रुळावर आणण्यास मध्य रेल्वेला प्रशासनाला यश आले आहे. परंतु उर्वरित एक डबा पुन्हा रुळावर आणण्यास प्रशासनाला विलंब लागणार आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
डाऊन जलद मार्ग अजूनही ठप्प
डाऊन जलद म्हणजे कल्याणच्या दिशेने जाणारा जलद मार्ग अद्याप ठप्प आहे. हा मार्ग सुरू होण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागणार आहेत. तर कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या काही लोकल गाड्या व मेल एक्स्प्रेस अप फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. डब्यांची रेलचेल, ओएचई वायर आणि ट्रॅक फिटनेसचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत, भायखळा आणि माटुंगा स्थानकांवरून धीम्या मार्गावरील वाहतूक वळवली जाईल. असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लोकल धावणार रविवारच्या वेळापत्रकानुसार
या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तसेच शनिवार १६ एप्रिलला मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर, रविवार १७ एप्रिलच्या वेळापत्रकानुसार लोकल गाड्या चालवल्या जातील. धीम्या गाड्या सुद्धा खोळंबल्यामुळे प्रवासी स्थानकांवरून पायी प्रवास करत आहेत.
Join Our WhatsApp Community