मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बुधवारी सकाळी खोळंबा झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी आणि जोगेश्वरी या रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. हा तांत्रिक बिघाड झाल्याने जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा झाला खोळंबा)
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाऊन जलद मार्गावरील जलद लोकल रखडल्या आहेत. बुधवारी सकाळी कामावर जाणाच्या वेळी हा बिघाड झाल्याने आणि काही लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.
दरम्यान, बुधवारी सकाळच्या सुमारास झालेल्या तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत बिघाड दुरूस्त करण्यात आला आहे. बिघाड झाल्यानंतर काही वेळातच बिघाड दुरूस्त करण्यात आला. मात्र सकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. या बिघाडाने लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
Join Our WhatsApp Community