Mumbai Local Train Update: अति-मुसळधार पावसामुळे कल्याण येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत

1341
Mumbai Local Train Update: अति-मुसळधार पावसामुळे कल्याण येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत
Mumbai Local Train Update: अति-मुसळधार पावसामुळे कल्याण येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई, ठाणे, नवी-मुंबईसह उपनगरांना मागच्या ४८ तासांपासून पावसाने अक्षरश:झोडपून काढलं आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही, सोमवारी पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. गेल्या ४८ तासापासून सुरू असणार्या पावसाचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य-हार्बर मार्गावरील (Harbor Line) गाड्या उशिराने धावत आहेत. तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Mumbai Local Train Update)

(हेही वाचा – Manual Scavenging : अजूनही हाताने करावे लागते ‘हे’ काम; ८१ कामगारांचा मृत्यू काय सांगतो ?)

मध्य रेल्वेची (Central Local Railway) वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मध्ये रेल्वे मार्गावरील ट्रेन या ठाण्याकडून सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या तासभराने उशिरा धावत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कल्याण रेल्वे (Kalyan Railway Station) स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत (Railway Signal) बिघाड झाल्याने ट्रेन अनिश्चित कालावधीसाठी उशिराने धावत आहेत. (Mumbai Local Train Update)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.