जुन्या वर्षाला निरोप देत नविन इंग्रजी नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक मुंबईकर घराबाहेर पडतात. मात्र, मध्यरात्री लोकल बंद होत असल्याने सकाळच्या पहिल्या लोकल वाट पाहत थांबवे लागते. यंदा मात्र, 31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे. कारण 31 डिसेंबरला (December 31st) पश्चिम आणि मध्य रेल्वेने (Western and Central Railway) विशेष लोकल (Special local train) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Local Train Update)
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटी ते कल्याण लोकल चालवण्यात येईल. ही लोकल कल्याण येथे रात्री ३ वाजता पोहोचेल. मध्यरात्री १.३० वाजता कल्याण ते सीएसएमटी लोकल चालवण्यात येईल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री ३ वाजता पोहोचेल. तसेच हार्बर मार्गावरून मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटी ते पनवेल लोकल चालवण्यात येईल. ही लोकल पनवेल येथे रात्री २.५० वाजता पोहोचेल. तर, मध्यरात्री १.३० वाजता पनवेल ते सीएसएमटी लोकल चालवण्यात येईल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री २.५० वाजता पोहोचेल. या चारही विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.
(हेही वाचा – Boxing Day Test : मेलबर्न कसोटीचा दुसऱ्या दिवशी हवामान कसं असेल? खेळपट्टी भारतीय फलंदाजांना साथ देईल का?)
पश्चिम रेल्वेवर आठ विशेष गाड्या
मंगळवारी रात्री १.१५ वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल रात्री २.५५ वाजता विरार येथे पोहचेल. रात्री २ वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल रात्री २.४० वाजता विरार येथे पोहचेल. रात्री २.३० वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल पहाटे ४.१० वाजता विरार येथे पोहचेल. रात्री ३.२५ वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल पहाटे ५.०५ वाजता विरार येथे पोहचेल. रात्री १२.१५ वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल रात्री १.५२ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. रात्री १२.४५ वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल रात्री २.२२ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. रात्री १.४० वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल रात्री ३.१७ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. रात्री ३.०५ वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल पहाटे ४.४१ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. या आठही लोकल फेऱ्यांना सर्व स्थानकांवर थांबा असेल, (31 December special local train) अशी माहिती पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community