Mumbai Local Train Update: मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; बोरिवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ सेवा ठप्प! 

871
Mumbai Local Train Update: मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; बोरिवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ सेवा ठप्प! 

मुंबईत पश्चिम मार्गावरील (Western Railway) बोरिवली स्थानकात (Boriwali Station) तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे उशीर झाल्याची प्राथमिक माहिती रेल्वेने ‘X’ वर दिली आहे. सर्व धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. (Mumbai Local Train Update)

(हेही वाचा – Jitendra Awhad यांच्याकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान)

ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे बोरिवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे जलदगतीच्या गाड्या उशिराने धावत आहेत. बोरिवली स्थानकामध्ये सध्या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु सकाळी ०७ वाजण्याच्या दरम्यान प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.  (Mumbai Local Train Update)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.