अनंत चतुर्दशीला मुंबई सेंट्रल – चर्चगेट दरम्यान लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार

अनंत चतुर्दशीला दरवर्षी चर्नी रोड स्थानकावरून गणेशभक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगावकडे मार्गस्थ होतात. यावर्षी स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान जलद मार्गावरील सर्व स्थानकांवर लोकल गाड्या थांबणार आहेत.

( हेही वाचा : पुणे महापालिकेतील भरतीच्या तारखा आठवड्याभरात जाहीर होणार)

मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा 

९ सप्टेंबर सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या कालावधीत लोकल गाड्यांना थांबा असेल अशी माहिती देण्यात आली. ९ सप्टेंबरला चर्नी रोड स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरून एकही गाडी उपलब्ध होणार नाही. तसेच या दरम्यान, चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री आठ विशेष फेऱ्याही चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक

  • चर्चगेट ते विरार – मध्यरात्री १.१५
  • चर्चगेट ते विरार- मध्यरात्री १.५५
  • चर्चगेट ते विरार – मध्यरात्री २.२५
  • चर्चगेट ते विरार – मध्यरात्री ३.२०
  • विरार ते चर्चगेट – रात्री १२.१५
  • विरार ते चर्चगेट – रात्री १२.४५
  • विरार ते चर्चगेट – रात्री १.४०
  • विरार ते चर्चगेट – रात्री ३.००

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here