Mumbai Local चे रुपडे ‘पालटणार’ रेल्वे मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

84

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे संदर्भात आनंदाची वार्ता आहे. 2025 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 23,778 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सोमवारी दिली. येत्या काळात 10 टक्के रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक आनंदायी होणार आहे. दरम्यान, सोमवारी 03 फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे भवन ‘दिल्ली’ येथून महाराष्ट्रात सुरू असलेल्या रेल्वे विकास कामांची आणि आगामी काळात भारतीय रेल्वे कशा प्रकारे सुसज्ज असेल याची माहिती दिली. (Mumbai Local

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘वंदे भारत’ (Vande Bharat Express) एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी आरामदायी प्रवास आणि अधिक चांगले वायुविजन अशा वैशिष्ट्यांसह नव्या रचनेतील मुंबई उपनगरी रेल्वेची (Mumbai Local) बांधणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. त्याचबरोबर लोकलच्या 10 टक्के फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. नव्या लोकल बांधणीसाठी ‘आरडीएसओ’ला सूचना देण्यात आल्या असून, याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – मुंबई बँक सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करते; विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचे प्रतिपादन)

महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी 20 पट अधिक अर्थसंकल्प

दरम्यान, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 (Central Railway Budget 2025-26) च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यवार अर्थसंकल्पातील तरतुदी आणि रेल्वे सेवेतील बदलांची माहिती दिली. यावर्षीच्या अर्थसंकल्पात (Budget 2025) महाराष्ट्रासाठी 23,778 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 301 किलोमीटर लांबीचे रेल्वे प्रकल्प मुंबईत 16,400 कोटी रुपये खर्चून सुरू आहेत. 2009-14 दरम्यान महाराष्ट्राला देण्यात आलेल्या वार्षिक 1171 कोटी रुपयांच्या सरासरी तरतुदीपेक्षा हे 20 पट अधिक आहे.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह पुढील तपासणीसाठी बंगळुरूमध्ये दाखल, चॅम्पियन्स करंडक खेळणं अवघड?)

टर्मिनल विस्तार आणि बांधकाम

मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि जोगेश्वरी येथे टर्मिनल्सचे बांधकाम सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, परळ, लोकमान्य टिळक टर्मिनल आणि कल्याण येथे टर्मिनल विस्तार आणि बांधकाम सुरू आहे. यासाठी 16,400 कोटी रुपयांची नवीन कामे करण्यात आली आहेत. 2014 पासून आतापर्यंत महाराष्ट्रात 2,105 किमी नवीन मार्गिका टाकण्यात आल्या आहेत, ज्या देशातील एकूण ट्रक संख्येपेक्षा जास्त आहेत.

132 स्थानकांचा पुनर्विकास

अमृत भारत स्थानक योजने (Amrit Bharat Station Yojana) अंतर्गत महाराष्ट्रातील 132 स्थानकांवर पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. राज्यात सध्या 1,70,000 कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यापैकी 17,107 कोटी रुपयांचे 301 किलोमीटरचे प्रकल्प मुंबईत राबवले जात आहेत.

मध्य रेल्वेचे प्रस्तावित प्रकल्प 

सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका  

पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय मार्गिका 

ऐरोली-कळवा एलिवेटेड कॉरिडॉर

कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका

कल्याण-कसारा तिसरी मार्गिका 

कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका

नीलजे-कोपर डबल कॉर्ड मार्गिका 

(हेही वाचा – काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडखोरीचा कडेलोट? Nana Patole यांच्या नेतृत्वावर गंडांतर!)

मध्य रेल्वे कवच 4.0 ने सुसज्ज होणार

भारतीय रेल्वेमध्ये कवच 4.0 ची अंमलबजावणी जलद गतीने केली जात असल्याची माहिती ही रेल्वेमंत्र्यांनी दिली. त्यानंतर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना म्हणाले की, मध्य रेल्वेच्या सर्व ब्रॉड गेज मार्गांवर कवच बसवले जाईल.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.