मुंबईत गोवरची साथ दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी गोवंडीतील अजून एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला. आता मुंबईत गोवरमुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मृत्यू निश्चित समितीने ९ मृत्यूंमागे गोवरच कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मुंबईत आता २०८ बालकांना गोवरची लागण झाली आहे. तर ३ हजार २०८ रुग्ण संशयित म्हणून अधिका-यांना पाहणीत आढळले आहेत.
एक वर्ष तीन महिन्यांच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला. हा मृत्यू गोवरचा संशयित मृत्यू म्हणून पालिका आरोग्य विभागाकडून नोंदवला गेला. मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेत पालिकेने आतापर्यंत ३ लाख ८ हजार २७ घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण केल्याची माहिती दिली. सोमवारी २४ नव्या गोवर रुग्णांचीही भर पडल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. तर दिवसभरात २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
( हेही वाचा फेसबुक युजर्ससाठी महत्त्वाची अपडेट; १ डिसेंबरपासून होणार मोठा बदल! )
गोवरची साथ पसरलेले विभाग
भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी-पूर्व, कुर्ला, भांडूप, मालाड, चेंबूर, गोवंडी आणि दहिसर
Join Our WhatsApp Community