त्या बालकांचा मृत्यू गोवरच्या बाधेमुळेच; वाचा समितीचा रिपोर्ट

मुंबईत गोवरची साथ दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी गोवंडीतील अजून एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला. आता मुंबईत गोवरमुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मृत्यू निश्चित समितीने ९ मृत्यूंमागे गोवरच कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मुंबईत आता २०८ बालकांना गोवरची लागण झाली आहे. तर ३ हजार २०८ रुग्ण संशयित म्हणून अधिका-यांना पाहणीत आढळले आहेत.

एक वर्ष तीन महिन्यांच्या मुलीचा सोमवारी मृत्यू झाला. हा मृत्यू गोवरचा संशयित मृत्यू म्हणून पालिका आरोग्य विभागाकडून नोंदवला गेला. मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेत पालिकेने आतापर्यंत ३ लाख ८ हजार २७ घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण केल्याची माहिती दिली. सोमवारी  २४ नव्या गोवर रुग्णांचीही भर पडल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. तर दिवसभरात २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

( हेही वाचा फेसबुक युजर्ससाठी महत्त्वाची अपडेट; १ डिसेंबरपासून होणार मोठा बदल! )

गोवरची साथ पसरलेले विभाग 

भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी-पूर्व, कुर्ला, भांडूप, मालाड, चेंबूर, गोवंडी आणि दहिसर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here